बातम्या

ए वाय पाटील यांच्यासह 40 जणांच्या वर गुन्हा दाखल.

A case has been registered against 40 people including AY Patil


By nisha patil - 4/17/2024 12:56:00 PM
Share This News:



विनापरवाना मेळावा व गर्दी जमविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्यासह 40 जणांविरुद्ध करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला गेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांच्या समर्थनार्थ हा मेळावा पुईखडी येथील मंगल कार्यालयात घेतला गेला. यातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात येऊन ए वाय पाटील यांनी कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मेळाव्यात सामील असणाऱ्या 40 जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. 


ए वाय पाटील यांच्यासह 40 जणांच्या वर गुन्हा दाखल.