बातम्या

सांगलीत तीन घोडींसोबत क्रूरकृत्य अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

A case has been registered against an unknown person for cruelty to three horses in Sangli


By nisha patil - 8/24/2023 4:31:56 PM
Share This News:



सांगलीत अज्ञात व्यक्तीने तीन घोडींच्या योनी  तांब्याच्या तारेने शिवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी 2020 मध्ये या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तीन घोडींच्या अवघड जागा तांब्याच्या तारेने  अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आले आहे. या तीन घोडींचं वय अंदाजे दोन ते तीन वर्षे असल्याचं समजतंसंबंधित तीन घोड्या सांगलीतील भारती हॉस्पिटलसमोर इथे बेवारस रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. घोडींची झालेली ही अवस्था खूप दुर्दैवी, वेदनादायक आणि बेकायदेशीर असल्याचे लक्षात आले. ॲनिमल राहतचे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ किशोर पोळ यांनी त्वरित पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची माहिती फोन करुन दिली आणि पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन फिर्याद दिली. ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय डॉ. राकेश चित्तोरा, डॉ. विनायक सूर्यवंशी, डॉ. अजय बाबर, श्री. गोरखनाथ कुराडे यांच्यामार्फत घोडींना भूल देऊन संबंधित तांब्याच्या तारा काढून घेतल्या. डॉक्टरांनी तांब्याच्या तारा काढताना वेदनाशामक इंजेक्शनही दिले आणि त्यांना त्रासातून मुक्त केले. तिन्ही घोडींना रस्त्यावर जखमी अवस्थेत सोडले असते तर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल, यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.


सांगलीत तीन घोडींसोबत क्रूरकृत्य अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल