बातम्या
पुण्यात 'झेप्टो' कंपनीच्या मॅनेजरसह पाच डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल
By nisha patil - 6/14/2023 9:20:45 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम पुण्यात महिलांच्या छेडछाड प्रकरणी "झेप्टो" कंपनीच्या मॅनेजरसह पाच डिलिव्हरी बॉय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयात ये-जा करणाऱ्या महिलांची छेडाछाड काढल्याप्रकरणी झेप्टो कंपनीचे सूरज गायकवाड, स्टोअर मॅनेजर मोईन हन्नुरे आणि इतर अनोळखी चार ते पाच डिलिव्हरी बॉय यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सगळ्यांविरोधात मंगळवारी उशिरा भारतीय दंड संहितेच्या कलम 354A, 354D, 509, 107, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 48 वर्षीय महिलेने याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीनुसार, महिला काम करत असलेल्या ऑफिसच्या इमारतीच्या खाली झेपटो कंपनीचे गोदाम आहे. त्याठिकाणी तक्रारदार आणि त्यांच्या सहकारी महिलांसोबत कामावर येत-जात असताना, झेप्टो कंपनीचे मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजर तसंच डिलिव्हरी बॉय त्यांची छेड काढत होते. इथे काम करणाने सर्व जण तक्रारदार महिलेसह इतर महिलाबाबत अश्लील भाषेचा वापर करत असत. तसंच घरापर्यंत पाठलाग करुन जाणीवपूर्वक महिलांसमोर कपडे बदलत असत. हा सगळा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरु होता
पुण्यातील विमाननगरमधल्या लालवानी प्लाझा इथे विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये सुमारे 150 महिला काम करतात. झेप्टोचे गोडाऊन आणि कार्यालय तळमजल्यावर असल्याने, डिलिव्हरी बॉईज जमतात आणि महिलांना पाहून गैरवर्तन करतात, मग त्यांचं वय कितीही असो. शहरात किराणा आणि भाजीपाला वितरण सेवा पुरवणाऱ्या झेप्टोच्या गोदामातून डिलिव्हरी बॉय सामान घेण्यासाठी येतात. इथल्या कार्यालयात कामासाठी येणाऱ्या महिलाच नव्हे, तर या याच आवारातील निवासी इमारतीतील महिलांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.
किमान 50-60 डिलिव्हरी बॉय इथे येतात. दुचाकी पार्क करुन ते जागा अडवतात. अश्लील भाषेत शेरेबाजी, महिलांचा विनयभंग करण्यासोबतच त्यांच्या मोबाईल फोनवर मोठ्याने गाणी वाजवतात तसंच व्हिडीओ शूट करतात," असं इथल्या महिला कर्माचाऱ्यांनी सांगितलं.
पुण्यात 'झेप्टो' कंपनीच्या मॅनेजरसह पाच डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल
|