बातम्या

केरलेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल..

A case has been registered against teachers in the death of a student in Kerala


By nisha patil - 11/22/2024 10:01:36 PM
Share This News:



केरलेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल..

 करवीर तालुक्यातील केर्ले येथील कुमार हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या ११ वर्षीय स्वरूप माने या विद्यार्थ्याचा शाळेच्या लोखंडी गेटच्या खाली आल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.हि घटना काल दुपारच्या दरम्यान घडली होती.दरम्म्यान याप्रकरणी दोघा शिक्षकांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्वरूप हा लघुशंकेसाठी जात असताना शिक्षक वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने हे स्वरूप माने याला दुरावस्थेत असलेले दोरीने बांधलेला शाळेचे गेट बाजूला करण्यास सांगितले. त्यावेळी ते गेट त्याच्या अंगावर पडले. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे स्वरूपचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आली असून या प्रकरणी दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर शाळेतील सुरक्षा उपायांची पुन्हा तपासणी करण्याच्या मागणी जोर धरली आहे.


केरलेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल..