बातम्या
भुदरगड तालुक्यात वन्यपक्षी शिकार प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल..
By nisha patil - 11/1/2025 10:42:38 PM
Share This News:
भुदरगड तालुक्यात वन्यपक्षी शिकार प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल..
तपासणी अंतिम आरोपीने वन्यजीवांची शिकार केल्याचे कबूल...
"कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात मौजे वासनोली पैकी जोगेवाडी धनगरवाडा येथे वन्यपक्षी शिकार प्रकरण उघडकीस आले आहे. 10 जानेवारी 2025 रोजी कडगांव वनपरिक्षेत्रातील रात्रगस्तीदरम्यान दोन आरोपींना वन्यपक्षी कुडतुडा/चकोत्रा, सिंगल बोअर बंदूक आणि इतर साहित्यांसह आढळून आले. तपासणीअंती या आरोपींनी वन्यजीवांची शिकार केल्याचे कबूल केले.
या प्रकरणी अनिल बळवंत डवरी आणि प्रवण नेताजी डवरी यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासकार्य उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण व त्यांच्या टीमने पार पाडले.
भुदरगड तालुक्यात वन्यपक्षी शिकार प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल..
|