विशेष बातम्या

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

A case has been registered against two businessmen for defrauding the government


By nisha patil - 6/17/2023 2:40:36 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  तीन वर्षाचा 1 कोटी 49 लाख 27 हजार 613 रुपयांचा कर व त्यावरील व्याज आणि शास्ती भरलेली नाही 
वेळोवेळी सूचना तसेच कर भरण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. 
व्यवसायाचा मूल्यवर्धित कर न भरता शासनाची 2 कोटी 38 लाख 36 हजार 876 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित मोहन मालंडकर  याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात तर विनोदकुमार जुगलकिशोर दायमा याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहआयुक्त कार्यालय कोल्हापूरचे राज्य कर निरिक्षक श्रीकांत सुभाषराव भांडे  व राज्य कर निरिक्षक अर्चना भिमराव पाटील यांनी तक्रार दिली आहे. 
गावभाग परिसरात राहणारे अमित मोहन मालंडकर यांचा ए अ‍ॅन्ड पी एजन्सी नांवे स्टेशनरी, कटलरी व फेरविक्रीचा व्यवसाय आहे. मालंडकर यांनी सन 2010-11, 2011-12 आणि 2012-13 या तीन वर्षाचा 1 कोटी 49 लाख 27 हजार 613 रुपयांचा कर व त्यावरील व्याज आणि शास्ती भरलेली नाही. या संदर्भात कर निरिक्षक कार्यालयाकडून मालंडकर यांना वेळोवेळी सूचना तसेच कर भरण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. मात्र  मालंडकर यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 चे कलम 74(2) प्रमाणे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर विनोदकुमार जुगलकिशोर दायमा यांचा कापड, सूतधागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. सर्वोदय एंटरप्रायझेस नामक फर्मच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय चालतो. दायमा यांनी सन 2008-09, 2009-10 आणि 2010-11 या कालावधीचा 89 लाख 9 हजार  263 रुपयांचा कर भरलेला नाही. या संदर्भात कर निरिक्षक कार्यालयाकडून दायमा यांना वेळोवेळी सूचना तसेच कर भरण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. परंतु दायमा यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 चे कलम 74(2) प्रमाणे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य कर सहआयुक्त सुनिता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दिपाली पुजारी आणि सहायक राज्यकर आयुक्त दीपक शिंदे यांच्या पथकासह राज्य कर निरिक्षक श्रीकांत भांडे, अर्चना पाटील आणि शहाजी पाटील यांनी कारवाई केली .तारा न्यूज़ साठी इचलकरंजीहून विनोद शिंगे.


शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल