बातम्या
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By nisha patil - 3/21/2024 5:39:00 PM
Share This News:
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. क्रिकेटवरून झालेल्या वादातून पुण्यात गोळीबार करण्यात आल्याची घघटना समोर येत आहे. पुण्यातील कात्रज भागात हा सर्व प्रकार घडला असून, सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी नाही.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज भागात राहत असलेल्या दोन गटात क्रिकेटचा सामना मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मॅच सुरु असतानाच क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटातील तरुण पुन्हा बुधवारी भेटले. यावेळी एका गटात एक रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. तर, वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुन्हा वाद झाले. दरम्यान, यावेळी एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली. मात्र, ती गोळी त्याला लागली नाही. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
|