बातम्या

बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांवर लक्ष्मीपुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल

A case has been registered by the Lakshmipuri police against two people who were illegally carrying weapons


By nisha patil - 11/2/2024 9:38:36 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे  कोल्हापूर - लक्ष्मीपुरी पोलिसांनी जुना बुधवार पेठ परिसरात बेकायदेशीर रित्या शस्त्र जवळ बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केलाय. विपूल आंबी आणि संतोष भोसले अशी त्यांची नावे आहेत.  त्यांच्याकडून एक तलवार, कोयता आणि एक एडका जप्त करण्यात आलाय.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेद्र पंडित यांनी आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या नुसार ही कारवाई करण्यात आलीय.


बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांवर लक्ष्मीपुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल