बातम्या
कोल्हापुरातील चक्काजाम आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल...
By nisha patil - 11/24/2023 5:08:06 PM
Share This News:
गंत हंगामात गाळप झालेल्या उसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता आणि यावर्षी तीन हजार पाचशे रुपये पहिली उचल, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी पुणे बेंगलोर महामार्ग तब्बल नऊ तास रोखून धरला होता निर्णय होणार नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असा हा आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी महामार्गावरील पंचगंगा पुलाजवळ ठिय्या मांडला होता महामार्ग रोखून धरल्याने मुंबई पुणे सांगली सोलापूर सह कर्नाटकात जाणारी वाहतुक ठप्प झाली होती ऊस दरावरून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मागणीबाबत आयोजित बैठका निष्पळ झाल्याने स्वाभिमानीने महामार्गावर चक्का केला होता यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती अनेक प्रवाशांचे हाल झाले होते काही विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायच्या होत्या तर कोणाला दवाखान्यात जायचे होते अडलं होतं फक्त या आंदोलनामुळे त्यामुळे नागरिकांच्या मध्ये संतप्त होत होता. महामार्ग बंद ठेवल्याने या कारणास्तव राजू शेट्टी यांच्यासह अडीच हजार कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहे. यावर राजू शेट्टी म्हणाले की ज्यांना आमच्या आंदोलनामुळे त्रास झाला त्यांची मी माफी मागतो आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागला होता परंतु त्यामुळे काहींची गैरसोय झाली होती त्याबद्दल मी माफी मागतो पण माझ्या शेतकरी बंधूला समजून घ्या.
कोल्हापुरातील चक्काजाम आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल...
|