बातम्या

मुलीची छेड काढणाऱ्या युवका विरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

A case has been registered under POSCO against the youth who molested the girl


By nisha patil - 3/6/2023 6:58:24 PM
Share This News:



 इचलकरंजीतील कबनूर इथं सिद्धार्थ नगर परिसरातील मुलीची छेड काढून विनयभंग केल्या प्रकरणी मनोज थब्बे याच्या तरुणाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. वारंवार पाठलाग करत माझ्याशी लग्न कर असा तगादा थाब्बे याने पीडित मुलीकडे लावला होता. यानंतर पीडितेच्या आईने  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  केला  आहे

 आई वडिलांना मदत व्हावी यासाठी पीडित मुलगी कामात मदत करते. या परिसरातील मनोज थब्बे हा गेल्या काही दिवसापासून या मुलीचा पाटलाग करत माझ्याशी लग्न कर म्हणत होता. त्याचबरोबर  अश्लील हावभावदेखील  करत होता. झालेला प्रकार पीडित मुलीने आई वडिलांना सांगितला आई-वडिलांनी जाब विचारून त्याला समजही दिली होती पण तरीसुद्धा मनोज पीडितेला त्रास देत होता. यानंतर तिच्या आई-वडिलांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मनोज थब्बे  याच्या विरोधात पोक्सो  आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला . सध्या मनोज थब्बे याला  पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत शहरामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे पोलिसांनी असल्या रोडरोमिओ  यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत. तारा न्यूजसाठी  इचलकरंजीहून विनोद शिंगे


मुलीची छेड काढणाऱ्या युवका विरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल