बातम्या

बदलत्या हवामानाचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम

A changing climate has a major impact on global warming


By nisha patil - 10/4/2024 6:55:12 PM
Share This News:



हवामान बदलांचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम झाला आहे. मार्च महिना जगात सर्वात उष्ण  महिना ठरला आहे. मागील 10 महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात नवीन तापमानाचे  विक्रम प्रस्थापित होत आहेत.  एप्रिल 2023 ते मार्च 2024 या 12 महिन्यांच्या कालावधीत देखील सर्वात उष्ण असा काळ होता अशी माहिती या अहवाल देण्यात आलीय. 
 

तापमानवाढीचा ट्रेंड दिसत असल्याने हवामानवेगाने बदलत आहेत
दरम्यान, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक सरासरी तापमान पूर्व औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा 1.50 अंश सेल्सिअस खाली ठेवणं अपेक्षित होतं. मात्र, मागील एका वर्षातील कालावधीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत जागतिक सरासरी तापमान 1850-1900 या पूर्व-औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा 1.58 अंश सेल्सिअस जास्त होते. जागतिक स्तरावर अनेक संस्थांकडून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने दीर्घकाळ तापमानवाढीचा ट्रेंड दिसत असल्याने हवामान बदल वेगाने होत असल्याचं चित्र दिसत आहे. 2023 हे वर्ष जागतिक स्तरावर सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली होती. आताआता पुन्हा तोच तापमानवाढीचा ट्रेंड कायम दिसत असल्याने चिंतेत भर पडली आहे. 

 

तापमानवाढीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम जागतिक हवामानात सातत्यानं बदल होत आहे. याचा मोठा परिणाम सजीव सृष्टीवर होतोय. सध्या तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. ही वाढती उष्णता मानवी आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक आहे. तसेच याचा शेती क्षेत्रावरही मोठा परिणाम दिसून येत आहे.  जग सरासरीने अधिक उष्ण होत असताना, या तापमान वाढीमुळे विरोधाभासी परिणाम होऊ शकतात. यामध्ये वारंवार तीव्र हिमवादळे तयार होणं. वातावरणातील बदल अनेक मोठ्या मार्गांनी जगावर परिणाम करु शकतात त्यातीलच एक म्हणजे बर्फ वितळवणे, महासागरांचे संतुलन बिघडणे यावर हवामान बदलाचा मोठा परिणाम होतो. त्यामुळं तापमानवाढ रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या आसपास गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. तर काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळं तिथं काही प्रमाणात उष्णता कमी झालीय. 


बदलत्या हवामानाचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम