बातम्या

अंगावर झाड कोसळून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

A college girl died after a tree fell on her body


By nisha patil - 7/23/2024 9:56:08 PM
Share This News:



मुंबई, कोकणात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे, मुंबईतही मुख्यमंत्र्‍यांनी आणि इतर ठिकाणी जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला असून पावसाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डोंगराळ प्रदेशातील नागरिकांनाही दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन अतिदक्षता घेण्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, तरीही दरडी कोसळण्याच्या व भींत कोसळणे, किंवा झाडपडीच्या घटना घडत आहे. सांवतवाडी  तालुक्यात अशीच एक झाडपडीची घटना घडल्याने एका महाविद्यालयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्याने एका कुटुंबाच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे.


अंगावर झाड कोसळून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू