बातम्या
पन्हाळा वरील मुख्य मार्गावर दरड कोसळली
By nisha patil - 3/10/2023 4:10:36 PM
Share This News:
पावसामुळे पन्हाळ्याच्या मुख्य मार्गावर दरडीतील दगडी शिळा कोसळल्या यामुळे प्रवाशांसह पर्यटकांची गैरसोय झाली रस्त्यावर दरड कोसळली तेव्हा वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान या मार्गावरील वाहतूक धोक्याची सुरू आहे
गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळगडावर पावसाने हजेरी लावल्यामुळे दरडीतील दगडी शिळा सोमवारी कोसळल्या त्यामुळे दिवसभर पन्हाळ्यावर येणारी वाहतूक बुधवार पेठेपासून तीन तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील दगडी शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी नायब तहसीलदार संजय वळवी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते या घटनेमुळे दरडीतील दगडी शिळांनी आपली मूळ जागा सोडली असून सर्व दगड कधीही कोसळू शकतात अशी स्थिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा पन्हाळ्याचा मुख्य मार्ग बंद होण्याची दाट शक्यता आहे याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी पर्यायी रस्त्याची मागणी होत आहे
पन्हाळा वरील मुख्य मार्गावर दरड कोसळली
|