बातम्या

सकाळी एक कप हा चहा हृदयविकाराचा धोका करेल कमी

A cup of this tea in the morning will reduce the risk of heart disease


By nisha patil - 5/1/2024 7:45:31 AM
Share This News:




 चहाचे नाव घेतले तरी अनेकांचा थकवा निघून जातो. चहा पिल्यानंतर अनेकांना छान वाटते. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अनेक जण चहा पितात. सकाळी उठल्यावर देखील अनेकांना आधी चहा लागतो.

एक कप चहा प्यायल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. काहींना आल्याचा चहा आवडतो तर काहींना मसाल्यांचा चहा आवडतो. तर काही समस्या आल्यानंतर लोकं ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पितात. पण तुम्हाला माहित आहे का सकाळी काळ्या चहाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

अनेक संशोधनात असे समोर आले आहे की काळ्या चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल असतात, जे तुम्हाला कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. अनेक तज्ञांचे असे मत आहे की चहाचा शरीरावर निर्जलीकरण प्रभाव असतो. जर तुम्ही रोज 2-3 कप चहा प्यायला तर चहा न पिणार्‍यांपेक्षा हा धोका 70 टक्के कमी असतो.

दात मजबूत करतो

काळ्या चहात फ्लोराईड आणि टॅनिन मुबलक प्रमाणात आढळतात. जे तुमच्या दातांमध्ये प्लाक जमा होऊ देत नाही. त्यामुळे तुमचे दात मजबूत राहतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात

काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट, पॉलिफेनॉल, दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे याचे रोज सेवन केले पाहिजे.

वजन कमी करण्यास मदत

काळ्या चहामध्ये कॅलरीज कमी असतात. याचे सेवन केल्याने भूक कमी लागते. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.


सकाळी एक कप हा चहा हृदयविकाराचा धोका करेल कमी