बातम्या
चहाशिवाय दिवस जात नाही मग तर हे वाचाच! चहा पिण्याचे 5 तोटे
By nisha patil - 8/30/2023 7:54:10 AM
Share This News:
चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. अनेक ठिकाणी या पेयाचं सेवन केलं जातं. चहाचे अनेक प्रकार सुद्धा आहेत. चहाचे फॅन्स चहा घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही. अनेक लोकांना तर कामात सुद्धा काही सुचत नाही.
“वेळेला चहा हवा, चहाला मात्र वेळ नसते” असंही ब्रीदवाक्य चहा प्रेमींनी बनवलंय. पण तुम्हाला चहा प्यायचे तोटे माहित आहेत का? चहा प्यायचे फायदे सुद्धा आहेत आणि नुकसान आहे. आज आपण बघणार आहोत चहा प्यायचे तोटे! काय आहेत तोटे? बघुयात…
1. कॅफिनची सवय
दिवसातून अनेकवेळा चहा पिण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपल्याला चहामध्ये असणाऱ्या कॅफिनची सवय लागते. काही लोकांना तर याचं व्यसन लागतं म्हणून त्यांना चहा नाही मिळाला तर त्यांच्याकडून काम होत नाही, ते गडबडतात. असे अनेक लोकं तुम्ही आजूबाजूला देखील पाहिले असतील. वेळेवर चहा न मिळाल्यास अस्वस्थता आणि डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते. यालाच म्हणतात कॅफिनची सवय लागणे ज्याचा परिणाम न्यूरॉन्सवर होतो.
2. पोट खराब होणे
अनेक जण आपल्याला सल्ला देतात की चहा कधीच रिकाम्या पोटी पिऊ नये. आपल्यापैकी खूप लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची सवय असते ज्याला आपण बेड टी म्हणतो. बेड टी ही पद्धत फॅन्सी दिसत असली तरी ती आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. चहा उग्र असतो, उठल्या उठल्या आपलं पहिलं पेय पाणी असावं. मग काहीतरी खाऊन चहा घ्यावा. उपाशी पोटी चहा घेतला की पॉट खराब होते.
3. मधुमेह
चहा प्यायल्याने मधुमेह होण्याची शक्यता असते. चहामध्ये आपण साखर टाकतो. साखर खाल्ली की शरीरातसुद्धा साखरेचं प्रमाण वाढतं याने मधुमेह होतो. मधुमेहावर उपचार नाहीत पण मधुमेह नियंत्रित करता येतो. त्यामुळे शक्य तितका चहा प्यायचा टाळा. बहुतेक डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना साखरेचा चहा न पिण्याचा सल्ला देतात.
4. लठ्ठपणा
लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनलीय. बऱ्याच लोकांचं हेच ध्येय असतं, लठ्ठपणा कमी करणे! चहाच्या सेवनामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा तुम्हाला जर कमी करायचा असेल तर चहा पिण्यावर नियंत्रण असुद्या.
5. हृदयाच्या आरोग्यावर होणारे परिणाम
आपण काय खातो, काय पितो यावर आपलं आरोग्य असतं. हृदय निरोगी ठेवायचं असेल तर चहा टाळायलाच हवा. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजच्या आहारातून काही गोष्टी वगळल्या पाहिजेत, त्यापैकीच एक म्हणजे चहा. यामध्ये असे काही घटक आढळतात जे हृदयासाठी धोकादायक असतात.
चहाशिवाय दिवस जात नाही मग तर हे वाचाच! चहा पिण्याचे 5 तोटे
|