बातम्या

ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आज संभाजीराजेंना भेटणार

A delegation of OBC leaders will meet Sambhaji Raj today


By nisha patil - 11/20/2023 3:40:27 PM
Share This News:



 मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करण्यात येत आहे. कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एल्गार महासभा झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजात वाद पाहायला मिळतोय. अशातच ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आज संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेणार आहे.
      जालन्यातील सभेतून छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण घेण्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर संभाजीराजे यांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आज संभाजीराजेंना भेटणार आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे.


ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आज संभाजीराजेंना भेटणार