बातम्या

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राबविला आगळावेगळा उपक्रम

A different activity was carried out on the occasion of Guru Poornima


By nisha patil - 3/7/2023 10:45:41 PM
Share This News:



कुंभोज वार्ताहर( विनोद शिंगे) आदर्श प्राथमिक विद्यामंदिर नेज या प्रशालेने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राबविला आगळावेगळा उपक्रम ,शाळेतील शिक्षक हे  जरी आपले गुरु असले तरीही आपले पहिले गुरू आपले आई-वडील असतातआणि या गुरूंना नियमितपणे वंदन केले पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी आदर्श विद्या मंदिर नेजया प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून आपल्या पालकांचे पाद्यपूजन करून घेतले  .तसेच उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्याकरिता व्याख्यानाचे आयोजन देखील या प्रशालेने केले होते या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांचे आई-वडील तसेच आजी आजोबा उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.आरोही वाडकर इयत्ता दुसरी या विद्यार्थिनीं ने गुरुचे महात्म्य आपल्या मनोगतातून सांगितले.पालकांनी आपण गुरु म्हणून आपल्या पाल्यासोबत कोणती भूमिका बजावली पाहिजे पाल्यांवर या वयात कोणते संस्कार केले पाहिजेत.याबाबतचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे व्याख्याते श्री गिरीश कुलकर्णी यांनी केले .कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पालक वर्गातील सौ. निशा कदम यांची निवड करण्यात आली होती.मान्यवरांचा सत्कार  मुख्याध्यापिका सौ . रेश्मा पाटील मॅडम यांनी प्रशाले कडून भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन केला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सावळवाडे मॅडम यांनी केले.प्रास्ताविक पुनम कुंभार मॅडम यांनी तसेच आभार नीलम कांबळे मॅडम यांनी केले .कार्यक्रमाचे सर्व नियोजन  प्रियंका पाटील मॅडम यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शहा सचिव अतुल शहा आणि उपाध्यक्ष जितेंद्र शहा यांचे मार्गदर्शन लाभले.


गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राबविला आगळावेगळा उपक्रम