बातम्या

मद्यधुंद पोलीसाची हातात कोयता घेऊन दहशत

A drunken policeman terrorized with a knife in his hand


By nisha patil - 10/19/2023 3:46:05 PM
Share This News:



मद्यधुंद   पोलीसाची  हातात कोयता घेऊन दहशतth 

पाचगाव मध्ये घडली घटना 

घटनेचा व्हिडियो सोशलमीडीयावर व्हायरल

संबधीत पोलीस आणि त्याचे पत्नीवर करवीर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल 

 

करवीर तालुक्यातील पाचगाव मधील गाडगीळ कॉलनी परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वाद थेट हातात कोयता  घेऊन दहशत वाजवण्यापर्यंत पोहोचला. या घटनेचा व्हिडियो सोशलमीडीयावर सोमवारी व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

करवीर तालुक्यातील पाचगाव हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या गावात घडणाऱ्या घटना आणि गुन्ह्यांकडे पोलीस विभागाचे बारकाईने लक्ष असते. त्यातच आज पाचगावातील गाडगीळ कॉलनीतील एक व्हिडिओ बाहेर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.

या व्हिडिओत रात्री दोन कुटुंबात वाद झाल्याला दिसून येतअसून एक इसम कोयता  घेऊन गल्लीमध्ये फिरताना दिसत आहे. दहशत वाजवणारा व्यक्ती आणि त्याची पत्नी हे पोलीस दलात आहेत. तर त्यांचा शेजारी राहणारा पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे. शेजारी राहणारा मुलगा आपल्या पत्नीकडे बघतो या संशयावरून पोलीस कर्मचाऱ्यांने थेट हातात सुरा घेऊन दहशत माजवली. कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे यांनी मद्यप्राशन केले होते त्यांच्या पत्नीने वादाला सुरवात केली शिवीगाळ तसेच मुलावर आरोप केलेने जाब विचारण्यास गेलेले शेजारी विनोद वावरे ,त्यांची बहीण,आणि दाजी यांना शिंदे दाम्पत्याने मारहाण केली 
कॉन्स्टेबल शिंदे हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे वावरे दाम्पत्याने झालेल्या घटनेचा विडिओ करवीर पोलिसात दाखवून  फिर्याद देणे साठी गेले असता करवीर पोलिसानी त्यांना ताटकळत ठेवले तसेच मारहाणीबाबत वैद्यकीय तपासणी पण केली नाही 

याबाबत वरिष्ठाकडे तक्रार केले नंतर फिर्यादीची तक्रार नोंदवून घेऊन चौकशी सुरु झाली आहे तसेच संबंधीतांवर योग्य कारवाई होतील असे आश्वासन वरिष्ठानी दिले आहे


मद्यधुंद पोलीसाची हातात कोयता घेऊन दहशत