बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न..
By nisha patil - 2/14/2025 3:53:30 PM
Share This News:
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न..
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेत जमिनीच्या वादातून अशोक राजाराम रेवडेकर यांनी पत्नी व मुलासह अंगावर रॉकेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. दरम्यान प्रसंगावधान राखून शाहूपुरी पोलिसांनी त्यांना अडवलंय.
जमिनीबाबत कोर्टाने अशोक रेवडेकर यांच्या बाजूने निकाल दिलाय.मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही.राधानगरी तालुक्यात स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याने अशोक रेवडेकर यांनी आत्मदहनाचे पाऊल उचलल्याचे सांगितलं
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न..
|