बातम्या

पवार कुटुंबीयांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या तिखट फैरी!

A fierce round of accusations and recriminations in the Pawar family


By nisha patil - 4/17/2024 12:55:16 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती मतदारसंघाची निवडणूक अख्या महाराष्ट्रात हाय व्होल्टेज चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वी बारामती अथवा पुणे जिल्ह्यामध्ये राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध विरोधी पक्ष असे रंगत असे. परंतु राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातील सदस्य हेच एकमेकांच्या वर बोचरी टीका करण्यात कुठेही मागे पडताना दिसत नाही आहेत. अत्यंत जहरी टीका ही दोन्ही बाजू कडून पहायला मिळत असून आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहेत.  प्रथम अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या वर  "वरिष्ठ वय झालेल्या व्यक्तींचा आपण आदर करत नाही यासारखा नालायक माणूस नाही अशी टीका केली"

तर सुप्रिया सुळे यांनी  "संसदेत खासदाराला जावं लागतं  खासदारांच्या पतीला तिथे प्रवेश नाही त्याला बॅग सांभाळत कॅन्टीनमध्ये बसावं लागतं कोण दादागिरी करत असेल तर जशास तसे उत्तर मिळेल" अशा शब्दात सुनेत्रा पवार व अजित पवार यांना टोमणा मारला" या ठिकाणावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की "मी तोंड उघडले तर मतदार संघात फिरणे मुश्किल होईल. आदराने गप्प बसलो याचा फायदा घेऊन वळवळ करू नका"

या सर्व टीकाटी पणीवर उत्तर देताना शरद पवार यांनी संयमाची भूमिका घेत असा सल्ला दिला की "कोणी दमदाटी करत असेल तर घाबरू नका. दमदाटी करणाऱ्यांना त्या जागेवरती मी बसवले आहे. आत्ता त्यांना दुरुस्त करण्याची व चुका सुधारण्याची वेळ आली आहे"

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच गाजताना दिसत आहे. 


पवार कुटुंबीयांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या तिखट फैरी!