बातम्या
श्री अंबाबाई मंदिर परिसरात वडाच्या झाडाला लागली आग
By nisha patil - 3/6/2023 6:57:38 PM
Share This News:
आज सर्वत्र वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रामाच्या पारा जवळ असलेल्या वडाच्या झाडाला फेरी मारण्यासाठी आणि पूजा विधीसाठी महिलांची मोठी गर्दी होत असते. आज सकाळी वटपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती त्या झाडाजवळ लावलेल्या कापूर आणि उदबत्तीने महिलांनी झाडाला बांधलेले दोऱ्यानी पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीने उपस्थित महिलांसह मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्नीरोधक मशीनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले अखेर काही वेळानंतर ही आग आटोक्यात आली.
श्री अंबाबाई मंदिर परिसरात वडाच्या झाडाला लागली आग
|