बातम्या

हिंदुस्थान फिरायला आलेल्या विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार

A foreign woman who came to visit India was gangraped


By nisha patil - 2/3/2024 7:46:51 PM
Share This News:



हिंदुस्थान फिरायला आलेल्या विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार


हिंदुस्थानच्या  प्रतिमेला धक्का बसवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंदुस्थानात फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. बलात्काराच्या या घटनेनंतर पीडित महिला स्वत: बाईक चालवत उपचारासाठी रुग्णालयात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुरुमाहाटच्या हंसडीहा हद्दीतील आहे. पीडित महिला मुळची स्पेनची रहिवाशी आहे. महिला आणि तिचा नवरा दोघेही परदेशातून टूरिस्ट वीजावर हिंदुस्थानात आले होते. हिंदुस्थानात येण्यापूर्वी ते पाकिस्तानात गेले. पाकिस्तानातून बांग्लादेश आणि तिथून झारखंड दुमका येथे येऊन पोहोचले होते. महिला आपल्या पतीसोबत फिरण्यासाठी म्हणून झारखंडमधील दुमका येथे आली होती.
 

शुक्रवारी ते दोघेही दुचाकीवरुन भागलपूरला चालले होते. परंतु त्यांना तेथे पोहोचायला उशीर होणार होता. त्यामुळे काही काळ विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला तंबू ठोकून राहिले होते. त्यावेळी महिला एकटी तंबूमध्ये असल्याचे पाहून आठ ते दहा लोक तिथे आले. त्यांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला आणि तेथून पळ काढला. तेवढ्यात पीडितेचा नवरा तेथे आला. पीडितेने घडलेल्या प्रकाराबाबत नवऱ्याला सांगितले. यानंतर पीडित महिला पतीसोबत दुचाकीवरुन दुमका येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचली.

घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच एसपी पितांबर सिंह खेरवार व इतर पोलीस अधिकारी हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लगेचच आरोपींचा शोध घेऊन यातील तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास देखील सुरु केला आहे. विदेशी महिलेसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा मुद्दा झारखंडच्या सभागृहातही उपस्थित करण्यात आला आहे.


हिंदुस्थान फिरायला आलेल्या विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार