बातम्या

वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद

A gang who stole two wheelers from different districts was jailed


By nisha patil - 12/7/2024 9:02:53 PM
Share This News:



 पोलिसांनी दुचाकी चोरांना जेरबंद करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवली होती. दरम्यान एका चोरीच्या  तपासात पोलिसांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्यांची विक्री यवतमाळ मध्ये  करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चक्क 20 दुचाकीसह लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाई मध्ये त्याच्याजवळून 10 लाख रुपये किमतीच्या 20 चोरलेल्या दुचाकीसह जप्त करण्यात आल्याय. लखन देवीदास राठोड, वैभव घुले , बादल राठोड, शुभम राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची 4 संशयित आरोपींची नावे आहेत. 4 जुलैला लालखेड येथून दुचाकी क्रमांक एमएच-32-आर-1126 चोरी गेली होती. या प्रकरणी लाडखेड पोलीस तपास करताना हा आंतरजिल्हास्तरीय चोरी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी हाती लागली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याच्याजवळून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद