बातम्या

शुक्रवारी मंडलिक प्रेमींचा मेळावा कोल्हापूरात

A gathering of Mandlik lovers in Kolhapur on Friday


By nisha patil - 3/14/2024 9:32:02 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे  कोल्हापूर : प्रतिनिधी  शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या समर्थनार्थ मंडलिक प्रेमी कार्यकर्त्यांचा शुक्रवारी, १५ मार्च रोजी कोल्हापुरात मेळावा होत आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झाली नाही. विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यांना उमेदवारीचा शब्द दिला असून आपली उमेदवारी निश्चित आहे असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघापैकी एक जागा आपणाला मिळावी असा दावा केला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खासदार धनंजय महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २० जागांसाठी  उमेदवारी जाहीर केली. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगलेचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. कोल्हापूरच्या जागे संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यामुळे खासदार मंडलिक यांनी दोन दिवस मुंबई दौरा करून वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुंबईहून परतल्यानंतर कोल्हापुरात पत्रकार शी बोलताना कोल्हापूर लोकसभेसाठी आपली उमेदवारी निश्चित आहे. नेत्यांनी आपणाला शब्द दिला आहे. याचा त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान मंडलिक प्रेमी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी मेळावा बोलविला आहे. मंगळवार पेठ येथील दैवैज्ञ बोर्डिंग येथे सायंकाळी चार वाजता हा मेळावा होत आहे या मेळाव्याला खासदार संजय मंडलिक उपस्थित राहणार आहेत.


शुक्रवारी मंडलिक प्रेमींचा मेळावा कोल्हापूरात