बातम्या

मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

A gathering of mass communication alumni in high spirits


By nisha patil - 1/28/2025 7:15:51 PM
Share This News:



मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. 
 

याप्रसंगी विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी 2005 पासून कोर्सची सुरुवात केल्याचे सांगितले. माजी विद्यार्थ्यांकडून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. यामध्ये त्यांनी 12 कलमी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यात माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे, कार्यशाळा घेणे, सामंजस्य करार करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता. 
 

या स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना विभागातील आठवणींना उजाळा दिला. सध्या विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. तसेच विभागासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्यांचे स्वागत डॉ. सुमेधा साळुंखे यांनी केले तर आभार जयप्रकाश पाटील यांनी मानले. यावेळी बी.ए. फिल्म मेकिंग, मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.


मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
Total Views: 52