बातम्या

दहावीत ९६.८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश

A girl student who secured 96 80 percent marks in class 10th


By Administrator - 5/8/2024 1:46:40 PM
Share This News:



कसबा बावडा: पंचवीस वर्षांची उत्कृष्ट शैक्षणिक  परंपरा असलेल्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पॉलीटेक्निकला गुणवंत विद्यार्थ्यांची सर्वोच्च पसंती मिळत आहे. यावर्षी दहावीमध्ये ९६.८० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीने पॉलीटेक्निकला प्रवेश घेतला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.

डी. वाय. पॉलीटेक्निकमध्ये वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. दहावीमध्ये ९६.८० गुण मिळवणाऱ्या ज्ञानेश्वरी सचिन सुतार या विद्यार्थिनीने कॉम्प्युटर  इंजिनिअरिंग शाखेसाठी प्रवेश घेतला आहे. तर ९६ टक्के गुण मिळवणाऱ्या आरती प्रकाश पाटील हिने कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तर ९२ टक्के गुण मिळवणाऱ्या आराध्या प्रकाश जाधव हिने मॅकेनिकल इंजिनिअरिंग व ८६.६० टक्के गुण मिळवणाऱ्या साई अविनाश ढोरमले याने सिव्हील इंजिनिअरिंग शाखेला प्रवेश घेतला आहे.

पॉलीटेक्निकची गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा, उपलब्ध विविध सुविधा लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून पॉलीटेक्निकला सातत्याने ‘व्हेरी गुड’ श्रेणीने गौरविण्यात येत आहे. एम.ई., एम.टेक., पीएच.डी. धारक प्राध्यापक विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत.  विविध संदर्भ साहित्याने परिपूर्ण ग्रंथालय, आय-५, आय-७ श्रेणीचे संच असलेलेली कॉम्प्युटर लॅब, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांची कामगिरी आणि उत्कृष्ट प्लेसमेंट यामुळे विद्यार्थी व पालकांची डॉ. डी. वाय. पॉलीटेक्निकला प्रथम पसंती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

   ज्ञानेश्वरीसह प्रवेश घेतलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन केले. 
   

 


दहावीत ९६.८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश