बातम्या
गुढीपाडव्या दिवशी कोल्हापूर मध्ये होणार भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रा -२०२४
By nisha patil - 3/29/2024 8:00:49 PM
Share This News:
गुढीपाडव्या दिवशी कोल्हापूर मध्ये होणार भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रा -२०२४
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी कोल्हापूर मध्ये करवीरगर्जना च्या वतीने .. भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्या निमित्त आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे..या शोभायात्रेत करवीर गर्जना ढोल ताशा ध्वज पथक,मराठी शाळांच्या जनजागृतीचे आणि इतर विशेष चित्ररथ,आणि या शोभायात्रेचे आकर्षण समजले जाणारे रांगाविष्कार दुचाकी पथक यांचा. सहभाग असणार आहे. या रंगाविष्कार दुचाकी पथकामध्ये पुरुष आणि महिला दुचाकी स्वार पारंपारिक आणि ऐतिहासिक अशा वेशभूषा मध्ये सहभागी होणार आहेत.
बालाचमु वेशभूषा स्पर्धा आणि रिल स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं असून आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहेत.
या नेत्रदीपक सोहळ्यात आणि रंगाविष्कार दुचाकी पथकामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करवीर गर्जना च्या वतीने करण्यात आलं आहे. हा ऐतिहासिक नेत्र दीपक सोहल्याची सुरुवात 9 एप्रिल गुढीपाडव्या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होणार आहे
हे शोभायात्रा मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-गुजरी या मार्गावरून ऐतिहासिक भवानी मंडप मध्ये या शुभ रात्रीची सांगता होईल .या सोहळ्यामध्ये पारंपारिक वेशभूषेमध्ये बालचमु, महिला, युवती , आणि पुरुषांची ही संख्या लक्षणीय ठरणार आहे.
या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ९५२७८८९९११ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करवीर गर्जनाच्या वतीने करण्यात आल आहे.
गुढीपाडव्या दिवशी कोल्हापूर मध्ये होणार भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रा -२०२४
|