बातम्या
राजधानी दिल्ली येथे शिवजयंतीचा भव्य सोहळा!
By nisha patil - 2/19/2025 7:30:38 PM
Share This News:
राजधानी दिल्ली येथे शिवजयंतीचा भव्य सोहळा!
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीत शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मोत्सव सोहळा युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला.महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मराठा लाईट इन्फंट्रीच्या वतीने महाराजांना मानवंदना देण्यात आली. दिल्लीत स्थायिक मराठी बांधवांनी एकत्र येत अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पाडला.
यावेळी दिल्ली शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीचे दादासाहेब जगदाळे, प्रवीण पाटील, संपत धनवडे, गोरख पाटील, हनुमंत चव्हाण, लोकेश सावंत, प्रमोद शिंदे, चंद्रसेन सावंत, सुशिल सावंत यांसह असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजधानी दिल्ली येथे शिवजयंतीचा भव्य सोहळा!
|