बातम्या

भारत-पाक सीमेवर होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

A grand statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be built on the Indo  Pak border


By nisha patil - 10/27/2023 7:19:05 PM
Share This News:



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. ‘माझी माती, माझा देश’ कलश यात्रेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. “प्रत्येक गावा-गावातून, घरातून नागरिक ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. आज विशेष ट्रेन इथून दिल्लीला रवाना होईल, तिथे हे सारे कलश एकत्र होतील” असं मुख्यमंत्री म्हणाले. लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यात येणार आहेत, त्या बद्दलच्या प्रश्नालाही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “आमचे मंत्री सुधारी मुनगंटीवार स्वत: लंडनला गेले. जी वाघनखं आहेत, त्याला इतिहास आहे आणि ती वाघनखं आपल्या देशात, राज्यात, महाराष्ट्रात आणणं प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद  आहे, ” 
   यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासंदर्भात मोठी घोषणा केली. “भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. आम्ही हा पुतळा तिथे पाठवलाय. लवकरच तो कार्यक्रम होईल. पाकिस्तानला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची भीती वाटेल, ते गर्भगळीत होतील” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 


भारत-पाक सीमेवर होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा