बातम्या
अवनि संस्थे मार्फत कचरावेचक महिलांचे आरोग्य शिबीर संपन्न.
By nisha patil - 12/26/2023 4:52:52 PM
Share This News:
अवनि संस्थे मार्फत कचरावेचक महिलांचे आरोग्य शिबीर संपन्न.
अवनी संस्था गेली ९ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचकांना संघटीत करण्यचा प्रयत्न करत आहे . सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवुन देणे , कचरावेचकांचे बचत गट तयार करणे , हक्काचे घर व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळवुन देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे .
यादवनगर डोंबारवाडा झोपडपट्टी मधील कचरावेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छते मुळे होणारे आजार या पार्श्वभुमिवर कचरावेचक महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर अवनि संस्थे मार्फत घेण्यात आले. या शिबीरास डॉ. अमरसिंह रजपूत यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपला परिसर तसेच दात स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासणे . जेवणापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत या विषयी माहिती दिली .हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी मा. अनुराधा भोसले अध्यक्षा अवनि संस्था यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबीरामध्ये ९८कचरावेचक महिलांची आरोग्य तपासणी केली . महिलांमध्ये त्वचारोग , कानाचे आजार , सर्दी , ताप, तसेच हिमोग्लोबिन व कॅल्शियम प्रमाण कमी असल्याचे आढळून आले .डॉ. अमरसिंह रजपूत यांनी त्वचारोग , कानाचे आजार , सर्दी , ताप , हिमोग्लोबिन व कॅल्शियम यावर औषधे दिली . तसेच धनुर्वात चे इंजेक्शन देण्यात आले.या आरोग्य शिबीराचे प्रास्ताविक जैनुद्दीन पन्हाळकर प्रकल्प समन्वयक यांनी केले. या शिबीरामध्ये ९८ कचरावेचक महिलांनी लाभ घेतला . सुत्रसंचालन कचरावेचक केडर संगिता लाखे यांनी केले.
आभार वैशाली मालप यांनी मानले . हे शिबिर यशस्वी होण्यासाठी स्नेहल जाधव सोशल वर्कर अवनि संस्था तसेच मिना सोनटक्के, सुषमा सोनटक्के, अर्चना डावाळे, अश्विनी सोनटक्के, ज्योती सोनटक्के, किशोर सोनटक्के,गजाबाई डावाळे, मालण सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.
अवनि संस्थे मार्फत कचरावेचक महिलांचे आरोग्य शिबीर संपन्न.
|