बातम्या
500 रुपयांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले...
By nisha patil - 2/3/2024 8:00:22 PM
Share This News:
कोल्हापुर- : न्यू लॉ कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल देण्यासाठी 500 रुपयांची लाच मागणारा कनिष्ठ लिपीक सोपान धोंडीराम माने (वय.54.रा. मसुटे कॉलनी,सरनोबतवाडी). याला 500 रुपयाची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हाशिवाजी विद्यापीठाच्या संलग्न असलेल्या भारती विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या न्यु लॉ कॉलेज,चित्रनगरी कोल्हापूर येथे लॉ कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून त्याने परिक्षा दिली होती .पण त्याने दिलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल प्रशासकीय कारणाने लागलेला नसल्याने त्यासाठी तक्रारदार याने क.लिपीक सोपान माने यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना निकाल लागण्यासाठी 500 रुपये फी द्यावी लागेल असे म्हणून तक्रारदाराकडे मागणी केली. त्याचवेळी लाचलुचपतच्या पथकाने त्याला रंगेहात पकडून त्याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे,पो.उपनिरीक्षक बंबरगेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.तसेच कोल्हापुर जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्यांच्या कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.
500 रुपयांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले...
|