बातम्या
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साही सुरुवात..
By Administrator - 1/15/2025 4:54:05 PM
Share This News:
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साही सुरुवात..
क्रिकेट स्पर्धेत करवीर, राधानगरी, हातकणंगले आणि शाहूवाडी चमकले..
मुख्य अधिकारी आणि कर्मचार्यांचा क्रीडा प्रेमाचा आनंद
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांची सुरुवात महिला क्रिकेट सामन्याने झाली. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या हस्ते शास्त्रीनगर मैदानावर करण्यात आले.
पुरुष क्रिकेट स्पर्धेत करवीर, राधानगरी, हातकणंगले, आणि शाहूवाडीच्या संघांनी विजयी कामगिरी केली. साखळी पद्धतीने आयोजित स्पर्धेत आज विविध सामन्यांमध्ये उत्कंठावर्धक क्षण पाहायला मिळाले.
उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, संतोष जोशी आणि अन्य अधिकाऱ्यांनी फलंदाजी व गोलंदाजीचा आनंद घेतला. क्रीडा स्पर्धेचा पुढील टप्पा 16 व 21-23 जानेवारी दरम्यान होणार आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साही सुरुवात..
|