बातम्या

चक्क व्हॅन मध्ये सापडलं पैशाचं घबाड

A lot of money was found in the van


By nisha patil - 9/5/2024 7:24:21 PM
Share This News:



पवई पोलिसांचा नाकाबंदी दरम्यान कॅश व्हॅनमधून 4 कोटी 70 लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी जप्त केली आहे. परवा रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली असता, पवई पोलिसांनी 4 कोटी 70 लाख रुपये कॅश व्हॅनमधून जप्त केले आहेत. पवई पोलिसांनी आयकर विभाग  आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी  त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.


चक्क व्हॅन मध्ये सापडलं पैशाचं घबाड