बातम्या

कोल्हापूरात मतदान केंद्रावर एका वूद्धाचा रांगेत मुर्त्यु

A man killed in a queue at a polling station in Kolhapur


By nisha patil - 7/5/2024 4:17:47 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी आज लोकसभेच्यातिसऱ्या फेरीत राज्यातील  अकरा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 45.13 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया सुरु असताना कोल्हापुरातून एक दुःखद बातमी
समोर येत आहे.

मतदान करण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध मतदाराचा मतदान रांगेतच
मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभारलेले महादेव श्रीपती सुतार (वय 69,
रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) हे वृध्द चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह, कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी
सीपीआरमध्ये दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . या घटनेमुळे मतदान केंद्र
परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती.


कोल्हापूरात मतदान केंद्रावर एका वूद्धाचा रांगेत मुर्त्यु