विशेष बातम्या
जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरात महिलांसाठी महा रक्तदान शिबिराचे आयोजन..
By nisha patil - 8/3/2025 12:35:24 PM
Share This News:
जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरात महिलांसाठी महा रक्तदान शिबिराचे आयोजन..
ताराराणी जयंती वर्षानिमित्त ओंकार वेलफेअर फाउंडेशनचा उपक्रम..
युवराज्ञी मधुरिमाराजेंचा पुढाकार
कोल्हापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि करवीर गादीच्या संस्थापिका शिवस्नुषा छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या त्रिशत्कोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त, कोल्हापुरातील महिलांसाठी विशेष महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या ओंकार वेलफेअर फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने हे शिबिर घेण्यात येणार असून, महिलांमध्ये रक्तदानाची जागृती व्हावी आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळावे हा यामागील उद्देश आहे.
या शिबिराला कोल्हापूरच्या युवराज्ञी श्रीमंत छत्रपती मधुरिमाराजे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार असून, 9 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवाजी मंदिरात हे शिबिर पार पडेल.
या उपक्रमात "मिले दोबारा" व इतर सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. विशेषतः रक्तदान चळवळीतील अग्रणी स्व. धनंजय पाडळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा संकल्पही या माध्यमातून करण्यात आला आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक यांनी सांगितले की, “रक्तदान केल्याने केवळ इतरांचे प्राण वाचत नाहीत, तर स्वतःच्या आरोग्यासाठीही ते उपयुक्त ठरते. महिलांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा, यासाठी हे शिबिर प्रेरणादायी ठरेल.”
उद्यिष्ट व भूमिका:
– महिलांमध्ये रक्तदानाबाबत जागृती
– आरोग्य विषयक मार्गदर्शन
– गरजवंतांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देणे
– सामाजिक बांधिलकीतून आरोग्य चळवळीला चालना देणे
या शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि रक्तदानासाठी 18 ते 60 वयोगटातील सुदृढ महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओंकार वेलफेअर फाउंडेशनने केले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरात महिलांसाठी महा रक्तदान शिबिराचे आयोजन..
|