विशेष बातम्या
दुकानगाळे भाडे आकारणीबाबत लवरकच बैठक...
By nisha patil - 2/15/2025 2:58:32 PM
Share This News:
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली. दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे ना. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
बैठकीत कसबा कागल येथील म्हाडा गृहप्रकल्पातील सदनिकांच्या किंमतीत कपात, केंबळी गावठाण प्लॉटच्या 7/12 नोंदी, भूमीहीन कुंभार समाजाच्या अतिक्रमण नियमितीकरण, आणि मालकी हक्काच्या जमिनीच्या आदेशातील दुरुस्ती या विषयांवर चर्चा झाली.
दूधगंगा धरणाच्या धरणग्रस्तांना मोबदला मिळावा तसेच सातारा–कागल राष्ट्रीय महामार्गाच्या कागल हद्दीतील प्रलंबित कामांचा आढावा घेतला गेला. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दुकानगाळे भाडे आकारणीबाबत लवरकच बैठक...
|