बातम्या

बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा - उद्योगमंत्री उदय सामंत

A meeting should be held in eight days to resolve the issue of Barvi Dam project victims  Industries Minister Uday Samant


By nisha patil - 10/7/2024 1:16:58 PM
Share This News:



नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात येत्या आठ दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन मार्ग काढावा, असे निर्देश उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

            बारवी धरणग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आज मंत्रालयात आज सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, आमदार मनीषा कायंदे, औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन शर्मा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

            बारवी धरणामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा होतो. या धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन कायदा लागू करणे, धरणग्रस्तांच्या गावांना पायाभूत सुविधा पुरविणे आदीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको आदी यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, असे यावेळी मंत्री  सामंत यांनी सांगितले.


बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा - उद्योगमंत्री उदय सामंत