बातम्या
अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत लवकरच मुंबईत होणार बैठक
By nisha patil - 1/15/2024 1:34:02 PM
Share This News:
अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत लवकरच मुंबईत होणार बैठक
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे याचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन
कोल्हापूर : मानधन वाढीसह अन्य विविध मागण्यासाठी गेल्या 42 दिवसांपासून सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रविवारी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. जरी आश्वासन दिले असले तरी मागण्या मान्यवर पर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
यादरम्यान सणाच्या दिवशीही आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरत अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शासकीय विश्रामधासमोर जोरदार निदर्शने केली. मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अंगणवाडी कर्मचारी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून मोर्चा आणि शासकीय विश्रामधामवर गेले. मोर्चा प्रवेशद्वारा अडविण्यात आला या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोर्चासमोर अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, सतीश चंद्र कांबळे, शुभांगी पाटील, आप्पासाहेब पाटील जयश्री पाटील यांची भाषणे झाली. मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपली एकजूट अशीच कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आदिल फरार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रथम आपण मंत्री तटकरे यांना भेटावे आपली भूमिका मांडावी या चर्चेनंतर पुढील भूमिका ठरवू असे सांगितले. संघटनेच्या नेत्यांनी तयारी दर्शवत शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आदिल फरास महिला जिल्हाध्यक्ष शितल फराटकटे आधी मान्यवर उपस्थित होते
अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत लवकरच मुंबईत होणार बैठक
|