बातम्या
अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार ....
By nisha patil - 8/5/2024 5:49:36 PM
Share This News:
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात ही घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतरगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आधी आरोपीनं पीडित मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं वय 18 वर्ष आहे. तर दोन्ही आरोपींचं वय सुमारे 20 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे.
4 मे रोजी आरोपीनं आणखी एका तरुणासोबत पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. अत्याचार झाल्यानंतर मुलगी घरी पोहोचली, त्यावेळी तिची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. कुटुंबियांनी विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केल्यावर पीडितेनं घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली.
अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार ....
|