बातम्या
कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस चीनमध्ये सापडला…
By nisha patil - 2/22/2025 6:07:51 PM
Share This News:
कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस चीनमध्ये सापडला…
वटवाघुळांमधील नवा करोना व्हायरस ‘HKU5-CoV-2’…
गेल्या पाच वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधुन जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगभरात प्रसार झालाय. यानंतर पुढील अडीच ते तीन वर्ष या संसर्गाचा फटका संपूर्ण जगाला बसलाय यामधून चिनी संशोधकांनी वटवाघुळांमधील एका नवीन कोरोना व्हायरस शोधून काढलाय.
व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली यांच्या चिनी संशोधकांच्या एका टीमने वटवाघुळांमधील नवा करोना व्हायरस शोधलाय. या नवीन व्हायरसचे नाव ‘HKU5-CoV-2’ असं आहे. तसेच हा नव्याने आढळलेला स्ट्रेन कोविड-19 प्रमाणेच आहे. कोविड-19 प्रमाणेच हा नवा विषाणू मानवी पेशींमधील ACE2 रिसेप्टरबरोबर जोडला जाऊ शकतो, असं संशोधनामधून समोर आलंय. 2020 च्या जागतिक कोरोना साथीमध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस चीनमध्ये सापडला…
|