बातम्या
‘योगसाधनेचे’ नवं रूप
By nisha patil - 8/3/2024 7:42:08 AM
Share This News:
योगसाधना ही आपल्या देशाची संपन्न परंपरा आणि खूप मोठा वारसा आहे. या पारंपरिक प्रकारचं नवं रुपडं म्हणजे ‘योगा’. योगाचे अष्टांग योग, हट योग, विक्रम योग, अय्यंगार योग असे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. पण बदलत्या काळात या प्रकारांना नवं रुपडं प्राप्त झालं आहे. पॉवर योगा, रोप योगा, अँक्रोबॅट योगा असे नवे प्रकारही योगसाधनेत आले आहेत.
सेलिब्रिटींनी मॉडर्न वर्क आउटसोबत योगाचं महत्त्व अधोरेिखत केल्याने प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीला योगाचे लाभ होत आहेत. गर्भावस्थेत योगा करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. गर्भावस्थेत अवघडलेल्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी योगासनांची मदत घेतली जाऊ शकते. पण यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योगाला प्राणायामची जोड दिल्यास डोकं शांत राहण्यास मदत होते.
ध्यानामुळे मेंदुचे दोन्ही भाग कार्यान्वित होऊन आंतरिक क्रियांना बळ मिळतं. योगमुद्रा शारीरिक हालचालींमध्ये चपळता आणते. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य पद्धतीने कार्यान्वित होते. प्राणायामामुळे हृदयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होते. त्यामुळे हृदयरोग किंवा हार्ट अँटॅक येण्याची शक्यता कमी होते.तर मग चला योगसाधना करू या निरोगी आयुष्याला प्राधान्य देऊ या !
‘योगसाधनेचे’ नवं रूप
|