शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांनी केले नवे संशोधन
By nisha patil - 1/24/2025 6:08:23 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागाने सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारा स्पंज शोधून काढलाय. विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी शुभम सुतार यांनी हे संशोधन केलंय.
निसर्गातील विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून 'बायोचार हा सांडपाण्यातून रंग-प्रदूषके शोधून घेणारा स्पंजसारखा सच्छिद्र पदार्थ निर्माण करणे आणि त्याची शोषण क्षमता वाढवत जाऊन संबंधित सांडपाण्याचे जास्तीत जास्त शुद्धीकरण करणे, अशी या संशोधनाची दिशा आहे. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने है संशोधन केलंय. शुभम सुतार या संशोधक विद्याथ्यर्थाने जांभळाच्या पानांपासून बायोचार तयार केला. बायोचारच्या शोषण क्षमतेमधील वृद्धीचे विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय.
शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांनी केले नवे संशोधन
|