बातम्या

बँकेच्या नव्या 'सिस्टिम'मुळे येणार नवी क्रांती

A new revolution will come due to the new system of the bank


By nisha patil - 5/29/2024 3:46:13 PM
Share This News:



सगळीकडे सध्याऑनालाईन पद्धतीने बँकेचे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यूपीआय, नेट बँकिंग आदी माध्यमातून आता अनेकजण पैशांची देवाणघेवाण करतात. दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने व्यवहार वाढल्यामुळे फसवणुकीच्या प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्यासाठी बँका योग्य ती खबरदारी घेत असतात. मात्र तरीदेखील आता ग्राहकांची ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी  बँकांनी आता विशेष इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली आहे. या प्रणालीच्या मदतीने ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
 

बँकांकडून एक क्रेडिट इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली जात आहे. या सिस्टिमच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या संशयास्पद व्यवहाराची संपूर्ण माहिती बँकांना मिळणार आहे. तुमच्याशी संबंधित कोणतेही संशयास्पद व्यवहार दिसून आल्यास, तसा तुम्हाला अलर्ट पाठवला जाईल. तसेच त्या आर्थिक व्यवहारासंदर्भात तुमच्याकडून कन्फॉर्मेशन न मिळाल्यास तो संबंधित व्यवहार रद्द केला जाईल. एचडीएफसी बँकेकडून यूपीआय, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड आदी व्यवहारांना ही सिस्टीम लागू केली जाणार आहे


बँकेच्या नव्या 'सिस्टिम'मुळे येणार नवी क्रांती