बातम्या
इचलकरंजी महापालिकेच्या ‘खुर्चीच्या खेळा’ला नवे वळण
By nisha patil - 2/14/2025 3:57:58 PM
Share This News:
इचलकरंजी महापालिकेच्या ‘खुर्चीच्या खेळा’ला नवे वळण
पल्लवी पाटील पुन्हा आयुक्त, दिवटे यांची बदली..
इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे, तर माजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय व राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलाने चर्चेला उधाण आले आहे.गेल्या आठवड्यातच इचलकरंजी महापालिकेवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमधील वाद कायम राहिला असून या बदलांमागे राजकीय व प्रशासकीय तणावाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.पल्लवी पाटील आणि ओमप्रकाश दिवटे यांच्यातील संघर्षाची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. अधिकार व निर्णयक्षमतेवरून उफाळलेल्या या वादाने महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण केले होते. 'खुर्चीचा खेळ' म्हणून ओळखला गेलेला हा संघर्ष अखेर पल्लवी पाटील यांच्या पुनर्नियुक्तीने संपुष्टात येईल का हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या ‘खुर्चीच्या खेळा’ला नवे वळण
|