बातम्या
विवेकानंदमध्ये “विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 7/10/2024 10:30:04 PM
Share This News:
आजच्या अनिश्चिततेच्या काळात जीवित व मालमत्तेची सुरक्षितता महत्वाची बनली आहे. त्यामुळे लोकांमध्ये विमाक्षेत्राबद्दलची जागरुकता विकसित झाली आहे.या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे विमा संरक्षण उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना रोजगारासाठी एक चांगला पर्याय निर्माण झाला आहे, असे उद्गार मा. प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी काढले. ते येथील विवेकानंद कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय (न्यू कॉलेज, कोल्हापूर क्लस्टर) अंतर्गत प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार हे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी रोजगाराच्या दृष्टीने विमाक्षेत्र हे खूप मोठे क्षेत्र आहे. दीर्घकाळ पैसे मिळविण्याचा एक उत्म मार्ग म्हणून विमाक्षेत्राला ओळखले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा लाभ घेऊन कष्ट् आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवावे. असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते एल.आय.सी. सहाय्य्क श्री ओंकार सिनकर यांनी विमाक्षेत्र व रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांकरीता एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी. बरोबरच विमाक्षेत्र एक चांगला पर्याय आहे. केवळ 10वी ,12 वीच्या पात्रतेवर विमा प्रतिनिधी म्हणून विमा क्षेत्रामध्ये काम करता येते, असे मत मांडले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते एल.आय.सी. विकास अधिकारी श्री. ओंकार चावरे यांनी विमाक्षेत्र व रोजगार या विषयावर मार्गदर्शन करताना सध्याची अनिश्चित परिस्थिती लक्षात घेता विमा क्षेत्र हे महत्वाचे क्षेत्र असून प्रत्येक व्यक्तीला विविध प्रकारच्या विमा संरक्षणाची गरज निर्माण होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. असे मत मांडले.
कार्यशाळेचे उद्घाटन मा. प्राचार्य यांच्या हस्ते रोपास पाणी घालून झाले. प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख व कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ.कैलास पाटील यांनी केले. आभार प्रा.आण्ण्ण्साहेब वसेकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.संपदा टिपकुर्ले यांनी केले.
कार्यशाळेच्या समारोप सत्रामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यशाळेस डॉ. सोमनाथ काळे, प्रा.संदीप पाटील, प्रा.आशिष भस्मे, डॉ.विशाल वाघमारे, कॉलेजचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग व अग्रणी महाविद्यालय न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक सहभागी झाले होते.
विवेकानंदमध्ये “विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
|