बातम्या

गोखले कॉलेजमध्ये बौध्दीक मालमत्ता अधिकार (IPR) या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

A one day workshop on Intellectual Property Rights


By nisha patil - 9/10/2024 10:49:05 AM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत न्यू कॉलेज क्लस्टर दवारे गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात बौध्दीक मालमत्ता अधिकार (IPR) या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

मानसशास्त्र विभागामार्फत आयोजित कार्यशाळेचे उदघाटन शाहू कॉलेज, कोल्हापूर चे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए. एम. गाईंगडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर होते. उदघाटनपर भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी आयपीआर (बौध्दिक संपदा) या

विषयावर सविस्तरपणे माहिती विशद केली. प्रथम सत्रात डॉ. किशोर गायकवाड यांनी बोलताना कॉपी राइट अॅक्ट नियम व महत्व या विषयी सविस्तर पणे माहिती विशद केली.

द्वितीय सत्रात डॉ. धुळे यांनी बोलताना ट्रेडमार्क आणि ड्रेडसिक्रेट याविषयावरील माहीती देवून महत्व समजावून सांगितले.

तृतीय क्षेत्रात प्रा. डॉ. वाय. ए. पाटील यांनी बोलताना पेटंट कायदा, तरतूदी व त्याचे होणारे दूरगामी परिणाम याची माहिती सविस्तरपणे दिली. सदर कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, सेक्रेटरी प्रा. जयकुमार

देसाई, पेट्रन कॉन्सिल सदस्य दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, कौन्सिल सदस्य प्रा. पी. बी. झावरे, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस.एन.मोरे, प्रा. पी पी. सुतार, डॉ. ए. ए. कुलकर्णी, प्रा.डॉ. सी. पी. कुरणे, प्रा. डॉ. एम. के.पवार, प्रा. डॉ. एस. जी. राक्षसे, प्रा. डॉ. आर. पी. जाधव आदि उपस्थित होते. आभार प्रा.ए.एम.गाईगडे यांनी मानले.


गोखले कॉलेजमध्ये बौध्दीक मालमत्ता अधिकार (IPR) या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न