बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये डिजिटल मिडिया लिखाणावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
By nisha patil - 10/23/2024 3:39:42 PM
Share This News:
“आज पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये तयार होणाऱ्या डिजिटल माध्यमांवरील कंटेंटमध्ये एकसुरीपणा आला आहे. नवीन भन्नाट कल्पना आता कोल्हापूर, सांगली, अमरावती यांसारख्या शहरांतूनच येत आहेत. इथल्या बोली भाषा लोकांना भुरळ पाडत आहेत. त्यामुळे या शहरांमधील युवकांनी धाडस करून आपल्या भाषेत कंटेंट तयार केल्यास डिजिटल विश्वात त्यांना यश नक्की मिळेल.” असा विश्वास सुप्रसिद्ध पॉडकास्टर सौमित्र पोटे यांनी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे इंग्रजी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘डिजिटल मिडियासाठीचे लिखाण’ या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डी. आर. के कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ आर. एस. नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी डिजीटल मिडिया हे माध्यम अनेक संधी घेऊन आलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी लोकांवरील डिजिटल मिडियाचा प्रभाव या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात त्यानंतर सुप्रसिद्ध यूट्यूब कंटेंट क्रिएटर सुमित पाटील यांनी मिडिया विश्वात कसे वावरता येते आणि सर्व तांत्रिक बाबींपेक्षा कंटेंट महत्वाचा असतो ही बाब स्वतःचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांना स्पष्ट केला.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व ओळख इंग्रजी विभागप्रमुख डॉ कविता तिवडे यांनी केले. तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ श्रुती जोशी यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉ. विकास वाघमारे यांनी प्रमुख उपस्थित होते. इंग्रजी विभागाच्या प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. माधुरी पवार, स्नेहल वरेकर, कोमल व्होनखंडे, रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग यांचे या कार्यशाळेच्या नियोजनामध्ये सहकार्य लाभले. याप्रसंगी विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये डिजिटल मिडिया लिखाणावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
|