बातम्या
शहाजी महाविद्यालयात मानसशास्त्र विषयावर अग्रणी कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 1/13/2024 11:31:39 AM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात मानसशास्त्र विषयावर अग्रणी कार्यशाळा संपन्न
तारुण्यातील मानसिक आंदोलने वेळीच ओळखा डॉ.सुरेश संकपाळ यांचे आवाहन
कोल्हापूर: तारुण्यातील मानसिक आंदोलने वाढत चालली आहेत, ती वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना करा असे आवाहन महावीर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेश संकपाळ यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय अग्रणी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेतील तारुण्यातील मानसिक आंदोलनाचा मानसशास्त्रीय अभ्यास या विषयावरील कार्यशाळेत बीजभाषक म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोपास पाणी घालून या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ.जीवन पाटील यांनी मानसिक आंदोलनाचे स्वरूप व त्यामागील कारणे यांचे सविस्तर विवेचन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. शशिकांत शुक्ला यांनी मानसिक आंदोलने आणि ताण-तणाव व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली.
समारोप सत्रात न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहाजी महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.ए.बी.बलुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक आणि कार्यशाळेचा हेतू विशद केला. सूत्रसंचालन डॉ.राज बिरजे यांनी केले .आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एम. देसाई यांनी मांनले .या कार्यक्रमास नॅक समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील तसेच विविध महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक या कार्यशाळेत उपस्थित होते.
शहाजी महाविद्यालयात मानसशास्त्र विषयावर अग्रणी कार्यशाळा संपन्न
|