बातम्या
शहाजी महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी वरती अग्रणी कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 1/29/2024 2:26:00 PM
Share This News:
कोल्हापूर: सायबर सिक्युरिटी बाबत जागरूकता आसने ही काळाची गरज आहे, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी व आपली फसवणूक टाळावी असे आवाहन सायबर सिक्युरिटी पोलीस ठाणे कोल्हापूरचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत न्यू कॉलेज क्लस्टर मार्फत एक दिवशीय अग्रणी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षांनी होते.
श्री मनोज पाटील म्हणाले की, पूर्वी चोऱ्या मार्या, दरोडे मोठ्या प्रमाणात होत. पण आता सायबर गुन्ह्यातून फसवणूक होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी व दक्षता राखावी. कोणत्याही आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक करू नये.
आपला ओटीपी अथवा एटीएमची माहिती देऊ नये. बँक व्यवहाराचे डिटेल्स अगर आपली गोपनीय माहिती ऑनलाइन पद्धतीने टाकू नये, अथवा कुणालाही मोबाईलवरून देऊ नये. वीज भरणा व इतर ऑनलाइन आर्थिक व्यवहारांमध्येही मोठ्या प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अधिकृत वेबसाईटवरूनच अगर कार्यालयातूनच हे ऑनलाईन व्यवहार करावेत असे आवाहन त्यांनी केले. त्यातूनही कोणाची फसवणूक झाल्यास त्यांनी त्वरित संपर्क सायबर क्राईम शाखेत साधावा असे आव्हान त्यांनी केले.
ऍडवोकेट निखिल इनामदार यांनी सायबर गुन्ह्याबाबत कायदेशीर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. भारती विद्यापीठाच्या प्रा. किशोरी बुधले यांनी सायबर सिक्युरिटी मधील अडथळे व हल्ले यावरती माहिती दिली. डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.व्ही.ए.पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना समारोप कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक बीसीए विभाग प्रमुख प्रा. एस एस शेवाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल पवार यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. अमृता घोडके यांनी करून दिली. आभार डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी मांनले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ.पांडुरंग पाटील,सर्व प्राध्यापक,प्रशासकीय सहकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेस संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.के शानेदिवाण यांचे प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी वरती अग्रणी कार्यशाळा संपन्न
|