बातम्या

iPhone मध्ये नुकताच एक दमदार फीचर लॉन्च

A powerful feature launched recently in iPhone


By nisha patil - 12/14/2023 3:26:56 PM
Share This News:



ॲपल कंपनीच्या iPhone ची लोकप्रियता सध्या शिखरावर आहे. भारतात या स्मार्टफोनचे उत्पादन सुरु झाले आहे. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकपयोगी बदल, नवनवीन फीचर, जबरदस्त लूक यामुळे आयफोनची तरुणाईत खासा क्रेझ आहे. त्याची किंमत पण जास्त आहे. हा महागडा फोन खिशाचाच नाही तर त्या व्यक्तीचा रुबाब वाढवतो, हा समज रुढ झाला आहे. अनेक जण कर्ज काढून पण हा स्मार्टफोन खरेदी करतात. आयफोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी iPhone मध्ये एक दमदार फीचर जोडण्यात येणार आहे. Stolen Device Protection असे त्याचे नाव आहे. Apple कंपनी आयफोन युझर्ससाठी लवकरच iOS चे नवीन व्हर्जन घेऊन येत आहे. यामध्ये Stolen Device Protection ही सुविधा देण्यात येईल. ही सुरक्षेची दुसरी पायरी असेल. त्यामुळे आयफोन चोरीला गेला तरी, तरी त्याचा तो वापर करु शकणार नाही. कारण त्याला अनलॉक करणे सोपे नसेल. जर त्याने पासकोड माहिती करुन तो उघडला तरी त्याला फोनच्या डेटामध्ये बदल करता येणार नाही.iPhone चोरी होण्यापासून वाचविण्यासाठी आणि आतील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अपकमिंग फीचर आपोआप ऑन होईल. हँडसेट नेहमीपेक्षा इतर कोणत्या पण लोकेशनवर पोहचला तर हे फीचर ऑटोमॅटिक ऑन होईल. त्यानंतर युझर्सला आयफोनचा वापर करण्यासाठी ते ऑथिंकेट करावे लागेल. त्यासाठी पासकोड आणि Face ID चा वापर करावा लागेल. Apple ID बदलवण्यासाठी Factory Reset करावा लागेल. त्यासाठी पासकोड आणि Face ID चा वापर आवश्यक आहे.


iPhone मध्ये नुकताच एक दमदार फीचर लॉन्च